माझे नाव ज्ञानदेव वानखेडे. मी मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाही. मी अनुसूचित जाती मधीलच आहे, असे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे प्रसारमाध्यमांपुढे सांगत असले तरी, समीर यांच्या लग्नपत्रिकेवर त्यांचे नाव 'दाऊद' असे धडधडीत छापण्यात आले आहे. याबाबतची लग्नपत्रिकाच ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलीक-खान यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांचे नाव दाऊदच असल्याचा आणखी एक पुरावा समाेर आल्याने वानखेडे कुटुंबीयांना हा आणखी एक नवा धक्का असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा ७ डिसेंम्बर २००६ रोजी अंधेरी येथील समर्थ नगरच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला आहे. समीर हे दाऊद आणि जहिदा वानखेडे यांचे सुपुत्र असल्याचा उल्लेख या निकाहनाम्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे नाव दाऊदच असल्याचे यावरून स्पष्ट हाेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सदरची आमंत्रण पत्रिका जाहिदा यांच्या माता-पित्यांनी छापली असली तरी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या 'दाऊद' या नावाला ज्ञानदेव वानखेडे यांनी आक्षेप घेतला होता की नाही, हे मात्र स्पष्ट होत नाही. आता वानखेडे हे याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा :