शरद पवार जाणते राजा नव्हे लुटारू नेते : सदाभाऊ खोत | पुढारी

शरद पवार जाणते राजा नव्हे लुटारू नेते : सदाभाऊ खोत

मुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचा-यांचा संप सुरू आहे. एसटीचे विलीनिकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात कर्मचारी एकत्र आले आहेत. आंदोलन तिव्र झाले असून सरकार विरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आज कर्मचा-यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना साडी बांगड्याचा आहेर देण्याचा पवित्रा घेतला. पण पोलिसांनी हस्तक्षेप करत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना रोखण्यात आले. यावेळी भाजपचे नेते गोपिचंद पडळकर, आणि सदाभाऊ खोत यांनाही अडवले.

यावेळी सदाभाऊ खेत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार हे जाणता राजा नव्हे तर लुटारू नेते असल्याची घणाघाती टीका केली. तसेच मंत्री अनिल परब यांना विलगीकरण हाच उपाय असून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा सल्ल्ला दिला.

खोत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार गांजा ओढडत आहे. आंदोलन करणा-यांकडे पहायला त्यांच्याशी चर्चा करायला सरकारला वेळ नाही. अनिल परब यांना मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या संर्क्षनार्थ त्यांना साडी-भेट देणार आहे, असे त्यांनी सांगितले. शरद पवार म्हणतात संपावर मध्य मार्ग काढू, पण पवारांचा मध्य मार्ग नेमका कुठे आहे हे कधीच कळू शकलेलं नाही. सत्तेवर येण्यासाठी पवार साहेब पावसात भिजले, पण काल एसटी कर्मचारी पावसात भिजले, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पवारांना दिसले नाहीत हे राज्याचं दुर्देव असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांच्या पाठीशी राहू आणि अनिल परब यांना जेलमध्ये घालू, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

यावेळी एसटी कर्मचा-यांनी कामगार एकजुटीचा, विलिनीकरण झालेच पाहिजे अशा घोषणा देत आझाद मैदान दणाणून सोडले. आंदोलस्थळी मुंबई पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.

मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज (दि. २०) ११ वा दिवस आहे. एस.टी कर्मचारी आज आक्रमक झाले. आझाद मैदान कर्मचारी मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात कर्मचारी आहेत. यामुळे काहीकाळ वातावरण तापले. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकरत्यांना रोखले.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. संप आता अजून चिघळण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील संपकरी कर्मचार्‍यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात राज्यभरातील एसटी कर्मचार्‍यांनी एकत्रित येत आंदोलन करावे असे आवाहन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी काल शुक्रवारी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील काही एसटी कर्मचारी मुंबईकडे रवाना होत आहेत.

 

Back to top button