Cobra : विषारी कोब्रा बेडरूममध्ये घुसला आणि... | पुढारी

Cobra : विषारी कोब्रा बेडरूममध्ये घुसला आणि...

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा

येथील एका घरातील बेडरूममध्ये कोब्रा नाग (Cobra) आपल्या भक्ष्याच्या मागोमाग शिरला होता. त्यानंतर भक्ष्याची शिकार करून त्याला फस्त केले आणि तो कोब्रा बेडरूममध्येच सुस्त झाला. मात्र या कोब्रा पाहून त्या घरातील कुटूंबाची चांगलीच झोप उडाली. ही घटना कल्याण पश्चिमेकडे असणाऱ्या राधानगरी संकुलातील एका इमारतीत घडली.

नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडे असणारी जंगल आणि शेती नष्ट करून मोठमोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. त्यातच गेल्या 6 दिवसांपासून वातावरण अचानक बदलल्याने आपल्या बिळातून विषारी-बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी, तसेच थंडीपासून बचावासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना घडत आहेत.

अशीच एक घटना आज कल्याण पश्चिमेकडे असलेल्या राधानगरी संकुलातील एका इमारतीध्ये घडली. या ठिकाणी विशाल शिंदे हे आपल्या कुटूंबासह तळ मजल्यावर राहतात. सायंकाळच्या सुमारास शिंदे यांची मुलगी घरातील वॉशिंग मशीन शेजारी अभ्यास करण्यासाठी बसली होती. इतक्यात कोब्रा जातीचा नाग (Cobra) भक्ष्याच्या मागावर असल्याचे तिला दिसले.

नागाला बघताच तिने घरातून पळ काढला. घरात नाग शिरल्याची माहिती तिने घरच्यांना देताच सर्वांची झोपचं उडाली. काही वेळातच कोब्रा त्यांच्या बेडरूममध्ये भक्ष्याच्या मागोमाग शिरला. त्यानंतर विशाल शिंदे यांनी ही माहिती सर्पमित्र हितेश करंजावकर यांना दिली. सर्पमित्र हितेश यांनी घटनस्थळी येऊन कोब्रा पकडल्यावर शिंदे कुटुंबियाने सुटकेचा निःश्वास सोडला. हा साप इंडियन कोब्रा जातीचा असून 3 फूट लांबीचा आहे. या जातीचे साप खूपच विषारी असल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली. (Cobra)

विषारी घोणस बुकिंग ऑफिसच्या कुंडीत

दरम्यान दुसऱ्या घटनेत एका गृहसंकुलातील बुकिंग ऑफिसच्या आवारात असणाऱ्या, एका झाडाच्या कुंडीत विषारी घोणस तेथील कामगाराला आढळून आला. त्याने इतर सहकाऱ्यांना या ठिकाणी साप असल्याची माहिती देताच, सर्वजण ऑफिस बंद करून बाहेर पाळले. ही माहिती कळताच सर्पमित्र हितेश करंजावकर यांनी, घटनास्थळी येऊन या सापाला पकडले.

सहा दिवसांत 10 सापांना जीवदान

हिवाळ्याच्या दिवसांत विषारी-बिनविषारी साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे. कुठेही मानवी वस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना त्याची तत्काळ माहिती द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गेल्या सहा दिवसांत 7 विषारी आणि 3 बिनविषारी सापांना वन विभागातील अधिकाऱ्यांची परवागी घेऊन जंगलात सोडून दिले. तर शुक्रवारी या दोन विषारी सापांनाही निर्सगाच्या सानिध्यात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश करंजावकर यांनी दिली.

हे ही वाचा :

Back to top button