मराठी बिग बाॅस : विकास म्हणतो, "बाप बाप होता है" | पुढारी

मराठी बिग बाॅस : विकास म्हणतो, "बाप बाप होता है"

मुंबई, पुढारी ऑनलाईन

“ही पाइपलाईन तुटायची नाय”, या साप्ताहिक कार्यामध्ये कॅप्टन्सीसाठी कुठले दोन उमेदवार मिळणार याची चर्चा आणि प्लॅनिंग बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चांगलीच रंगत आहे. आज मीनल आणि विकास याच बाबतीत चर्चा करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे जय आणि विकासमध्ये मोठा राडा होणार आहे.

मीनल विकासला सांगणार आहे, मला असं firmly वाटतं विशाल आणि जय परत आले, तर नाही बनू देणार जयला यावेळी परत. तर दुसरीकडे घरामध्ये टास्कमध्ये जय आणि विकासचे मोठे भांडण बघायला मिळणार आहे. टास्क दरम्यान, दोघांमध्ये जोरदार भांडण होणार आहे.

जय विकासला सांगणार आहे, “तू शब्द सांभाळून वापर. विकासचं त्यावर रोखठोक उत्तर, येडामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तू काय काय बोलतो ते सांगू. जयने विकासला विचारलं, तू एकटा शहाणा आहेस का रे?” त्यावर विकास म्हणाला, “हो मी एकटा शहाणा आहे, दीड शहाणा नाही दोन शहाणा आहे. यावर विकासला जयने सल्युट केला.” विकास म्हणाला, “बाप बाप होता है!”

हे वाचलंत का ?

Back to top button