मुंबई; पुढारी ऑनलाईन : Mumbai 26/11 : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३० हून अधिक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. मुंबई शहरावर हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांपैकी ९ जणांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले. मुंबई पोलीस दलातील हवालदार तुकाराम ओंबळे यांनी २६ नोव्हेंबरच्या रात्री आपल्या छातीवर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडले होते. (mumbai 26/11 attack)
२६ नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला होता. (mumbai 26/11 attack)
एकमेव जिवंत पकडल्या गेलेल्या दहशतवादी अजमल कसाबची कसून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते. या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले. भारत सरकारने कसाबचा कबुलीजबाब आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले. हे सर्व पुरावे अमेरिका व अन्य देशांनाही देण्यात आले. पाकिस्तानने आधीच या प्रकरणी आपले हात झटकून कसाब व अन्य दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचे फेटाळून लावले होते; पण ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानचाच नागरिक असल्याचे मान्य केले.
२१ नोव्हेंबर : संध्याकाळ कराचीहून एका बोटीतून दहा दहशतवादी निघाले.
२२ नोव्हेंबर : शस्त्र वाटप झाले . प्रत्येकाला ३० गोळ्या असलेली ६-७ मॅगेझिन देण्यात आली. याशिवाय प्रत्येकाला ४०० गोळ्या, ८ हातबॉम्ब, एक ए.के. ४७ असॉल्ट रायफल, स्वयंचलित रिव्हॉल्व्हर, क्रेडिट कार्डे व सुका मेवा देण्यात आला होता.
२२ नोव्हेंबर : काही दहशतवादी ताजमहाल हॅाटेलमध्ये हत्यारे व दारुगोळा घेऊन राहण्यास दाखल झाले.
२३ नोव्हेंबर : पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एक भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला. त्यातील ४ कोळ्यांना ठार मारुन कप्तानाला भारताच्या किनाऱ्याकडे जाण्यास भाग पाडले.
२४ नोव्हेंबर : कुबेरच्या कप्तानाला ठार मारुन दहशतवादी गुजरातजवळ आले. तेथे पांढरा झेंडा फडकावून त्यांनी एका तटरक्षक नौकेला जवळ खेचले. चौकशी करण्यासाठी दोन तटरक्षक अधिकारी कुबेरवर आले असता त्यातील एकाला ठार मारले व दुसऱ्याला मुंबईकडे बोट नेण्यास भाग पाडले.
२६ नोव्हेंबर : दुपारी आणि संध्याकाळी दहशतवादी मुंबईपासून चार समुद्री मैलावर आल्यावर दुसऱ्या तटरक्षक अधिकाऱ्याला ठार केले. यानंतर संध्याकाळी दहशतवादी तीन हवा भरलेल्या छोट्या तराफ्यांत चढले आणि कुलाब्याकडे निघाले. – रात्री पाकिस्तानहून निघालेले ही दहा माणसे कफ परेडजवळ बधवार पार्क येथे आली. हे ठिकाण नरीमन हाउस पासून अर्ध्या किलोमीटरवर आहे.-रात्री उशीरा या दहांपैकी चार ताजमहाल होटेलमध्ये आले, दोघे ओबेरॉय ट्रायडेंटला गेले, दोन नरीमन हाउसला गेले तर उरलेले दोघे, आझम आणि इस्माईल, टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले.
२६ नोव्हेंबर : रात्री ११ :०० दहशतवादी ताजमहाल हॉटेलात घुसले.
२७ नोव्हेंबर : मध्यरात्र मुंबई पोलिसांनी हॉटेलास वेढा घातला.
२७ नोव्हेंबर : रात्री उशीरा ०१:०० हॉटेलाच्या मध्यवर्ती घुमटात प्रचंड स्फोट. इमारतीत आग.
२७ नोव्हेंबर : पहाटे ०२:३० दोन ट्रकमधून सैनिक दाखल. दर्शनी भागातील लॉबीवर कबजा. सगळ्यात वरच्या मजल्यावर आग
२७ : नोव्हेंबर पहाटे ०३:०० अग्निशमन दल आले. लॉबी आणि हेरिटेज इमारतीत गोळीबार.
२७ नोव्हेंबर : पहाटे ०४:०० अग्निशमन दलाने शिड्या वापरून २००+ व्यक्तींना सोडवले.
२७ नोव्हेंबर : पहाटे ०४:३० दहशतवादी मध्यवर्ती भागातून नवीन इमारतीत गेल्याची बातमी.
२७ : नोव्हेंबर : पहाटे ०५:०० बाँबपथक आणि कमांडो दाखल. पोलिसांनी मारा वाढवला.
२७ नोव्हेंबर : पहाटे ०५:३० आग आटोक्यात. दहशतवाद्यांनी १००-१५० ओलिसांसह नवीन इमारतीत ठाण मांडले.
२७ : नोव्हेंबर सकाळी ०६:३० सुरक्षा दले हल्ल्यासाठी सज्ज.
२७ नोव्हेंबर : सकाळी ०८:०० काही व्यक्तींची लॉबीतून सुटका.
२७ : नोव्हेंबर : सकाळी ०८:३० चेंबर्स क्लबमधून अजून ५० व्यक्तींची सुटका.
२७ नोव्हेंबर : सकाळी ०९:०० गोळीबार सुरुच. अजून काही माणसे आत अडकल्याची बातमी.[२४] २७ नोव्हेंबर : सकाळी १०:३० इमारतीच्या आत गोळीबारांच्या झटापटी.
२७ नोव्हेंबर : दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अजून ५० व्यक्तींची सुटका.
२७ नोव्हेंबर : संध्याकाळी १६:३० दहशतवाद्यांनी चौथ्या मजल्यावर आग लावली.
२७ नोव्हेंबर : सायंकाळी १९:२० अजून एन.एस.जी. कमांडो घटनास्थळी दाखल, होटेल वर नवीन हल्ला.
२७ नोव्हेंबर : रात्री २३:०० मोहीम चालूच.
२८ नोव्हेंबर : पहाटे ०२:५३ सहा मृतदेह मिळाले.
२८ नोव्हेंबर : पहाटे ०२:५३ – ०३:५९ दहा हातबॉम्बचा स्फोट
२८ नोव्हेंबर : दुपारी १५:०० मरीन कमांडोनी इमारतीच्या आतील स्फोटके निकामी केली.
२८ नोव्हेंबर : संध्याकाळी १६:०० आरमारी कमांडोंना सुमारे १५ अधिक मृतदेह मिळाले.
२८ नोव्हेंबर : संध्याकाळी १९:३० वा. इमारतीत नवीन झटापटी व स्फोट.
२८ नोव्हेंबर : रात्री २०:३० एक दहशतवादी पळून गेल्याची बातमी.
२९ नोव्हेंबर : पहाटे ०३:४०– ०४:१० पाच अजून स्फोट झाल्याची बातमी.
२९ नोव्हेंबर : पहाटे ०५:०५ आत उरलेल्या दहशतवाद्यांबद्दल सुधारित अटकळ.
२९ नोव्हेंबर : सकाळे ०७:३० पहिल्या मजल्यावरील आग चालूच, दुसऱ्या मजल्यावरही पसरली. इमारतीत चकमकी सुरुच.
२९ नोव्हेंबर : सकाळी ०८:०० कमांडोंनी ताजमहाल होटेलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे जाहीर केले. खोल्याखोल्यांतून शोधमोहीम सुरू. जनतेचा रस्त्यांवर जल्लोष.
२७ नोव्हेंबर : सकाळी ६ वा एन.एस.जी चे पथक हॉटेलापाशी दाखल.
२७ नोव्हेंबर : सकाळी ८:४० वा गोळीबाराचा आवाज, सेना व नौदलाच्या पथकाचे आगमन.
२७ नोव्हेंबर : दुपारी १३:३० वा दोन लहान ग्रेनेडचे स्फोट. इमारतीत अजून कुमक घुसली.
२७ नोव्हेंबर : दुपारी १५:२५ वा काही विदेशी नागरिकांची सुटका.
२७ नोव्हेंबर : संध्याकाळी १७:३५ वा शीख रेजिमेंटीचे आगमन, प्रचंड गोळीबार.
२७ नोव्हेंबर : संध्याकाळी १८:०० वा एअर इंडियाच्या इमारतीतून ओलिसांची सुटका काही विदेशी नागरिकांची रुग्णालयात रवानगी.
२७ नोव्हेंबर : संध्याकाळी १८:४५ वा स्फोटाचा आवाज दोन कंमांडो व २५ सैनिक जखमी झाल्याचा अंदाज. अजून काही ओलिसांची सुटका एकूण
२७ नोव्हेंबर : संध्याकाळी १९:१० वा एका अतिरेक्याला कंठस्नान.
२७ नोव्हेंबर : संध्याकाळी १९:२५ वा हॉटेलाच्या ४थ्या मजल्यावर आग
२७ नोव्हेंबर : रात्री २३:०० वा ऑपरेशन चालू
२८ नोव्हेंबर : सकाळी १० वा ट्रायडंटमधून काही ओलिसांची सुटका.
२७ नोव्हेंबर : दुपारी १५:०० कंमांडो ऑपरेशन संपले, २४ ओलिस नागरिक मृत, २ दहशतवादी ठार एकूण १४३ ओलिसांची सुटका.
२७ नोव्हेंबर : सकाळी ७.०० वा पोलिसांनी आजूबाजूच्या इमारती मोकळ्या करून ताबा घेतला.
२७ नोव्हेंबर : साकाळी ११.०० वा पोलिस व अतिरेक्यांच्यात गोळीबार, एक अतिरेकी जखमी.
२७ नोव्हेंबर : दुपारी १४:४५ वा अतिरेक्यांनी जवळच्या गल्लीत हातबाँम्ब फेकला, हानी नाही.
२७ नोव्हेंबर : संध्याकाळी १७:३० वा एन.एस.जी चे कंमांडोंचे आगमन, नौदलीय हेलीकॉप्टरने सर्वेक्षण.
२७ नोव्हेंबर : रात्री २३.०० वा ऑपरेशन चालू.
२८ नोव्हेंबर : मध्यरात्री २४ : ०० वा पहिल्या मजल्यावरुन ९ ओलिसांची सुटका.
२८ नोव्हेंबर : सकाळी ७:३० वा एन्.एस्.जी कंमाडोंनी नरीमन हाउसच्या गच्चीवर हेलीकॉप्टरने प्रवेश.
२८ नोव्हेंबर : पहाटे ३.०० वा एन्.एस्.जी कंमाडों आणि अतिरेकी यांच्यातील गोळीबार चालूच.
२८ नोव्हेंबर : रात्री ७:३० वा ज्यू धर्मगुरू, त्यांची पत्नी व इतर तिघे असे ५ जणांची अतिरेक्यांकडून हत्या.
२८ नोव्हेंबर : रात्री ८:३० वा एन.एस.जी कंमाडोंचे २ अतिरेक्यांना कंठस्नान, एन्.एस्.जी कंमाडों यांची मोहीम समाप्त. तशी सरकारकडून अधिकृत घोषणा.