पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत महायुतीमध्ये जाण्यासाठी बंड केले, त्यादिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी खोट बोललो, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांच्या बंडाची हकीकत सांगितली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, अजित पवारांनी बंड केले, त्यादिवशी मी लोणावळ्यात आहे, असे शरद पवारांना सांगितले. मी तिकडे काय चाललय? हे पाहण्यासाठी गेलो आणि शपथ घेऊन मोकळा झालो, असं शरद पवार सांगतात. ते खरचं आहे. शरद पवारांचा फोन आल्यानंतर मी घरात असतानाही लोणावळ्यात असल्याचे सांगितले.