मुंबई : पुढारी वृत्तसेवा अंबरनाथ रेल्वे स्थानकातील साईडिंगमध्ये एक रिकामी लोकल रुळावरून घसरली. त्यामुळे कल्याण ते बदलापूर दरम्यानची रेल्वे वाहतूक (रविवार) सकाळी विस्कळीत झाली. ही लोकल रिकामी असल्याने कोणीहीती जीवितहानी झाली नाही.
या विषयी अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ रेल्वे स्थानकात साईडिंगमध्ये रिकाम्या लोकलच्या एका डब्याचे एक ट्रॉली चाक रुळावरून घसरले. त्यामुळे डाउन दिशेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे डाउन दिशेला जाणारी एलएलटी ते विशाखापट्टनम लोकल अंबरनाथ स्थानकात होम सिग्नलवर थांबवली होती.
सीएसएमटी ते बदलापूर आणि अंबरनाथ लोकल उल्हासनगर स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. कल्याण ते बदलापूर दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर बदलापूर ते कर्जत लोकल सेवा सुरु आहे. घसरलेल्या लोकलचे चाक रुळावर आणण्यासाठी रेल्वे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
हेही वाचा :