स्वा. सावरकर विज्ञानवादी; गोमुत्रधारी हिंदुत्व त्यांना मान्य नव्हते – संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

Sanjay Raut
Sanjay Raut
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी होते. मात्र, त्यांचे हिंदुत्व विज्ञानवादी होते. गोमुत्रधारी हिंदुत्व त्यांना मान्य नव्हते, असं मोठं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. माध्यमांशी संवाद साधताने त्यांनी याविषयी आपले मत व्यक्त केले.

खासदार संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत मोठे वक्तव्य केले ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व हे विज्ञानवादी विचारांचे होते. त्यांना गोमुत्रधारी हिंदुत्व मान्य नव्हते.

रावसाहेब दानवे यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं; संजय राऊत यांचे आव्हान

संजय राऊत यांनी खासदार रावसाहेब दानवे यांचा मविआ निश्चितच पराभव करेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी दानवे यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान देखील दिले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news