उद्धव ठाकरे : ‘बंगालने जे केलं ते महाराष्ट्रात करण्याची हिंमत आहे का?’ | पुढारी

उद्धव ठाकरे : 'बंगालने जे केलं ते महाराष्ट्रात करण्याची हिंमत आहे का?'

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळाव्यामध्ये भाजपवर घणाघाती हल्ला चढवत महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विकृतपणा सुरु असल्याचे सांगितले. एकतर्फी प्रेमासारखं महाराष्ट्रावर ॲसिड फेकत असल्याचे ते म्हणाले. माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नसल्याचे सांगत त्यांनी नवहिंदूंकडूनच हिंदुत्वाला धोका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणातून मोदी सरकारसह राज्यातील भाजप नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. रोजगार निर्मिती, ड्रग्ज, केंद्राकडून मदतीचा आखडता हात, केंद्र आणि राज्याचे संबंध, हिंदुत्व, महिला सुरक्षा तसेच नवीन संकल्प आदी मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. त्यांनी सरसंघचालक यांची वक्तव्येच वाचून दाखवत भाजपवर कडाडून प्रहार केला.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या माझ्या हिंद बांधवानो असे संबोधत आपल्या भाषणाला सुरुवात
  • आपला आवाज कुणी दाबू शकत नाही, आणि दाबणारा जन्माला देखील आलेला नाही.
  • जिवंत शिवसैनिक हीच खरी शस्त्रे
  • मी मुख्यमंत्री आहे असे कधीच वाटता कामा नये,
  • माझं भाषण संपतय कधी आणि कधी चिरकतोय याची वाट पाहत असतात
  • चिरकणे हे त्यांच्यासाठी रोजगार हमी प्रमाणे झालं आहे
  • धमक असेल, तर अंगावर या ईडी सीबीआयची मदत घेऊ नका
  • पदाची जबाबदारी विचाराने घेतली आहे.
  • जबाबदारी पार पाडल्याशिवाय थांबणार नाही
  • मी फकीर नाही, झोळी घेऊन जाईन असे म्हणणार नाही
  • सत्तेचे व्यसन हा सुद्धा अंमली प्रकारच
  • गाय जगो आणि माय मरो ही आमचे हिंदुत्व नाही
  • स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही आणि भारतमाता की जय ओरडत बसायच
  • काहींच्या भाषणाची सुरुवातच भारत माता की जयने होते.
  • हे माझ राज्य हे त्यांचे राज्य असं चालणार नाही
  • केंद्राची ढवळाढवळ आता सहन केली जाणार नाही
  • देशातील ११ बंदराचा सीएसआर फंड गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न
  • मुलगी शिकली, प्रगती झाली, पण नोकरी कुठे आहे?
  • राज्यात लोकशाहीचा खून, तर उत्तर प्रदेशात मळा फुलला आहे का?

UNCUT मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण

Back to top button