पुढारी ऑनलाईन : प्रभू श्री रामाची आठवण मुख्यमंत्री शिंदे यांना आताच का झाली? तुम्ही पक्ष सोडून गद्दारी केल्यावर गुवाहाटीला गेलात, त्यावेळी अयोध्येला का गेला नाही. त्यावेळी तुम्हाला रामाची आठवण का झाली नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत उपस्थित केला. राम हे सत्यवचनी होते. तुम्ही ते कोठून घेणार. तुम्हाला रामाचा आशीर्वाद मिळणार नाही अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. धर्माच्या नावावर मुख्यमंत्री पर्यटन करायला अयोध्येला निघाल्याची झणझणीत टीका त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली. अयोध्येला कोणीही श्री रामाचे दर्शन घेउ शकते. त्यांनाही जाउदेत. मात्र त्यांना रामाचा आशिर्वाद मिळणार नाहीत. साधू महंतांचे आशीर्वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार असल्याच्या वृत्तावर विचारले असता, याआधी महंतांनी उद्धव ठाकरे यांना आशिर्वाद दिले होते. आता ते त्यांना देत आहेत. या आधी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना आशिर्वाद मिळाले होते. पुन्हा पुढच्या काळात ते उद्धव ठाकरे यांना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांच्या जेपीसीवरील प्रतिक्रियेवर बोलताना पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यांचा जेपीसीला विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही विरोधक जेपीसीच्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उद्योगपतींना या आधी तुरूंगात टाकलं होतं. मग आता काय झालं? ते अदानींवरच इतके मेहरबान का झालेत. त्यांच्यावर का कारवाई होत नाही असा प्रश्न राउत यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :