मुंबई : विद्यापीठ कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा दावणीला ! | पुढारी

मुंबई : विद्यापीठ कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा दावणीला !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार मागण्या पूर्ण करत नसल्याने मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी ऐन परीक्षा काळात परीक्षा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गुरुवारपासून होत असलेल्या परीक्षा कामकाजावर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. त्याचबरोबर २० फेब्रुवारीपर्यंत हे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान १६ फेब्रुवारीला कर्मचारी संपही करणार आहेत.

आश्वासित प्रगती योजना पूर्ववत करणे, सातव्या वेतन आयोगातील सर्व तरतूदी लागू करणे आदी मागण्यांबाबत केवळ आश्वासने दिली जात आहेत. यामुळे ऐन परीक्षा काळात आंदोलन पुकारले असल्याचे मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने म्हटले आहे. १४ फेब्रुवारी रोजी निदर्शने करणे, १५ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून हजर राहणे आणि १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा संप आणि २० फेब्रुवारीपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.

Back to top button