कुर्ला : माहिम मध्ये घराला भीषण आग; अनेक महागड्या कुत्र्यांचे वाचले प्राण | पुढारी

कुर्ला : माहिम मध्ये घराला भीषण आग; अनेक महागड्या कुत्र्यांचे वाचले प्राण

कुर्ला ; पुढारी वृत्‍तसेवा माहीम मधील मारीनगर मध्ये नित्य सहाय इमारतीला काल (शनिवार) रात्री भीषण आग लागली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका घराच्या एसीला ही आग लागली. ही आग संपूर्ण घरात पसरली. या घरात आग लागली तेव्हा विविध जातीचे महागडी कुत्रे या घरात होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या आगीतून कुत्र्यांची आणि घर मालकीनीची सुखरूप सुटका केली. तर या तीन मजली इमारतीच्या खाली एक छोटे रुग्णालयही आहे. तिथल्या रुग्णांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

हेही वाचा : 

Back to top button