शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी सकारात्मक : जयंत पाटील | पुढारी

शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी सकारात्मक : जयंत पाटील

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. मात्र, आघाडीबरोबर चर्चा करून कोणी ऐनवेळी बाजूला जाऊ नये, याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर पाटील माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी नवे मित्र जोडले तरी कोणाचा विरोध नाही. परंतु, मित्र जोडताना ते शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुण्यातील कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतील. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Back to top button