राज्यात घडविलेला अनधिकृत सत्तेचा डाव उधळला जाईल : संजय राऊत | पुढारी

राज्यात घडविलेला अनधिकृत सत्तेचा डाव उधळला जाईल : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना एकच आहे आणि एकच राहील. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली खरी शिवसेना आहे. ३५-४० लोक गेले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही. केंद्र सरकारच्या दबावापोटी राज्यात घडविलेल्या घटनाबाह्य सरकारचा डाव उधळला जाईल, असे शिवेसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्याच्यावर विश्वास ठेवतो. सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास आहे. देशात संविधान, कायदा अजूनही जीवंत आहे. राज्यात घटनाबाह्य सरकार केंद्राच्या दबावापोटी घडविले आहे. तो डाव उधळला जाईल. सरकार सर्व विषयावर बोलते मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर का बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर राज्यातील एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने राजीनामा देणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button