देवेन भारती यांनी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी पदभार स्वीकारला | पुढारी

देवेन भारती यांनी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी पदभार स्वीकारला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मुंबई पोलीस दलासाठी नव्याने पद निर्माण केलेल्या विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार देवेन भारती यांनी गुरुवारी सकाळी स्वीकारला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत कामकाजाचा आढावा घेतला. मात्र; प्रसारमाध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.

देवेन भारती यांनी यापूर्वी मुंबई पोलीस दलात कायदा व सुव्यवस्था या विभागात १५ एप्रिल २०१५ ते ७ एप्रिल २०१९ कालावधीत सह पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. याचबरोबर विविध तपास यंत्रणांमध्ये काम केले आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील जुना इमारतीमध्ये आले. पोलीस सहआयुक्त सत्यनारायण (कायदा व सुव्यवस्था) यांच्या दालनात गेले. सुमारे अर्धा तास देवेन भारती यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली.

त्यानंतर ते पत्रकारांना भेटण्यासाठी बाहेर आले मात्र; त्यांनी कोणत्याही विषयावर बोलण्यास बोलण्यास नकार दिला. पाच मिनिटांनंतर ते पुन्हा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण यांच्या दालनात गेले. दरम्यान, विशेष पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची पोलीस आयुक्त कार्यालयात (जुनी इमारत) भेट घेतली. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

.हेही वाचा 

नगर : झेडपीचे शिष्यवृत्तीत पाऊल पडती पुढे…! 12 फेब्रुवारीला परीक्षा; 11 चाचण्यांमधून पूर्वतयारी

महाराष्ट्र फाउंडेशनचे सुनील देशमुख यांचे निधन

ठाणे : मेट्रोचे बांधकाम सुरू असलेली लोखंडी प्लेट कोसळल्‍याने महिलेचा मृत्‍यू

Back to top button