Sharad Pawar : महापुरुषांच्या मुद्यांवरुन अकारण वाद नकोत : शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : महापुरुषांच्या मुद्यांवरुन अकारण वाद नकोत : शरद पवार

पुढारी ऑनलॉन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात संभाजी महाराजांबाबत केलेल्‍या विधानावर राज्‍यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पहायला मिळत आहे. याबाबत आज  राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. महापुरुषांच्या मुद्यांवरुन अकारण वाद नकोत, असे आवाहन त्‍यांनी केले आहेत. बारामती येथील एका कार्यक्रमादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.

या वेळी शरद पवार म्‍हणाले की, धर्मवारी’ आणि ‘स्वराज्यरक्षक’ या दोन्ही बिरुंदाबाबत वाद नकोत. छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अजित पवार हे लवकरच माध्यमांसमोर येतील, अशी माहितीही त्‍यांनी यावेळी दिली. दरम्यान, शरद पवारांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले. ते म्हणाले की, “इतरांच्या वक्तव्यावर मी काहीही बोलणार नाही.”

हेही वाचा :

Back to top button