मुंबई महापालिकेने पक्ष कार्यालय सील केल्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन | पुढारी

मुंबई महापालिकेने पक्ष कार्यालय सील केल्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावरून बुधवारी झालेल्या ठाकरे-शिंदे गटाच्या राड्यानंतर आज शिवसेनेसह महापालिका मुख्यालयातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पार्टीचे कार्यालय सील करण्यात आले. याच्या निषेधार्ध शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन पुकारले आहे.

मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाने ताबा सांगितल्यानंतर निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्व कार्यालायांना टाळे ठाकून सील केले. यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी निषेध करत महापालिकेच्या आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन पुकारले. दरम्यान शिवसेना पक्ष कार्यालयाच्या बाहेर तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाचा फलक होता. तो ठाकरे गटाने झाकला होता. गुरुवारी पुन्हा ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी त्यावर चिकटपट्टी लावून नाव झाकण्याचा प्रयत्न केला. या कार्यालयावरून निर्माण झालेला हा वाद अजून पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button