एस.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 200 कोटी रुपये मंजूर | पुढारी

एस.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 200 कोटी रुपये मंजूर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने शुक्रवारी 200 कोटी रुपये देण्यास मंजुरी देत त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यामुळे कर्मचार्‍यांचे नोव्हेंबर महिन्याचे रखडलेले वेतन लवकरच मिळणार आहे.

कोरोना आणि त्यातच कर्मचार्‍यांनी केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी महामंडळाला दर महिन्याला 360 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता.

Back to top button