शिवशक्ती-भीमशक्तीच्या आघाडीसाठी उद्धव ठाकरे - आंबेडकर यांच्यात चर्चा | पुढारी

शिवशक्ती-भीमशक्तीच्या आघाडीसाठी उद्धव ठाकरे - आंबेडकर यांच्यात चर्चा

मुंबई : शिवशक्ती-भीमशक्तीच्या आघाडीची चर्चा सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल दोन तास बैठक झाली. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सकारात्मक असलो तरी आपल्या अटी – शर्तींवरच आघाडी होईल, असे वंचितने स्पष्ट केले आहे. तर, शिवसेनेसह महाविकास आघाडीनेसुद्धा नव्या समीकरणांसाठी सकारात्मक असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत स्वत: उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि अन्य काही नेते उपस्थित होते. वंचित आघाडी ही शिवसेनेचा मित्र पक्ष असणार की महाविकास आघाडीत सामावून घेतले जाणार, या मुद्यावर थेट ठाकरे-आंबेडकर यांच्यात चर्चा झाली.

Back to top button