Samir Choughule : "हेअर ट्रान्सप्लांटसाठी मला इतका खर्च आला" | पुढारी

Samir Choughule : "हेअर ट्रान्सप्लांटसाठी मला इतका खर्च आला"

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी आपलं टक्कल झाकण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे. यांनी ट्रान्सप्लांटसाठी लाखो रुपये मोजलेले असतात. त्यामुळे अनेक चाहत्यांना आणि प्रेक्षकांना प्रश्न पडतो की, ट्रान्सप्लांट करण्यासाठी किती बरे पैसे मोजले असतील? त्याचं मजेशीर उत्तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ लोकप्रिय विनोदवीर समीर चौघुले (Samir Choughule) यांनी दिलेलं आहे.

Samir Choughule

समीर चौघुलेला (Samir Choughule) एका मुलाखतीत त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यात एका चाहत्यांना सरळ त्यांच्या केसांवरून प्रश्न विचारला. हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी किती खर्च आला, असा प्रश्न विचारला. पण, त्याचं उत्तर समीरने सकारात्मकरित्या दिलं.

 

समीर चौघुले म्हणाला की, “हा खरंच तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारला आहे. लोकांच्या मनात मी पॉझिटिव्हीटी निर्माण करतोय. लोकांना निदान माझ्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करावंस वाटतं हादेखील एक पॉझिटिव्ह भाग आहे. आता माझी काय हेअर ट्रान्सप्लांट करण्याची एजन्सी नाही. त्यामुळे मी काही ठराविक रक्कम सांगू शकत नाही. पण, मला साधारणपणे ३ लाखांपर्यंत खर्च आला. आता सध्या हेअर ट्रान्सप्लांट करणं स्वस्त झालं आहे. पण, आताची किंमत मला माहित नाही”

Samir Choughule

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, हा काॅमेडी शो निखळ मनोरंजन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातील कलाकार महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले आहेत. त्याच शोमधील समीर चौघुले हा आघाडीचा कलाकार असून राज्याभरात त्याचे चाहते आहेत.

हे पाहिलंत का? 

Back to top button