घाटकोपर येथील मनपाच्या रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा संचार | पुढारी

घाटकोपर येथील मनपाच्या रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा संचार

घाटकोपर, पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर मधील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले होते. ही घटना ताजी असताना आता घाटकोपरच्या बर्वे नगरमधील पालिकेच्या संत मुक्ताबाई रुग्णालयात भटके कुत्रे सर्रास फिरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

घाटकोपरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा वावर सर्रास सुरु आहे. याबाबत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून तक्रारी येत आहेत. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रुग्णालयातील  पाचव्या मजल्यावर पुरुष रुग्णांच्या विभागात भटकी कुत्री बिनधास्त फिरताना दिसत आहेत. यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.

अशा  परिस्थितीमुळे पालिकेच्या रुग्णालयाची स्वच्छता आणि सुरक्षितता या वर ही प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. या ठिकाणी या कुत्र्यांना बाहेर काढण्यास कोणी ही उपलब्ध नसल्याचे ही समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button