गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक संजय गायकवाडांना कळतो का? : महेश तपासे | पुढारी

गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक संजय गायकवाडांना कळतो का? : महेश तपासे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक आमदार संजय गायकवाड यांना कळतो का? असा संतप्त सवाल करत गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची मालिका भाजपने व शिंदे सरकारने स्वीकारली का? असेही तपासे यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची वक्तव्य केली. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी केलेले बंड हे शिवरायांच्या गनिमी काव्यासारखे होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा महेश तपासे यांनी निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गनिमी कावा काय याबाबतचा इतिहास संजय गायकवाड व शिंदे-फडणवीस सरकारने वाचण्याची आवश्यकता आहे, असे तपासे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंचे पवारांवरील वक्तव्य नैराश्यातून

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांना स्वतःचे ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत यश मिळत नाही. त्या नैराश्यातून ते बोलत आहेत. निवडणुका आल्या की शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. हे समीकरण राज ठाकरे यांना कळले आहे. ठाकरे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून लोकांची दिशाभूल करणारे आहे. शरद पवार यांचे व्यक्तीमत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असे तपासे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button