माझी मुंबई स्वच्छ मुंबई अंतर्गत अंधेरी होणार आता स्वच्छ! | पुढारी

माझी मुंबई स्वच्छ मुंबई अंतर्गत अंधेरी होणार आता स्वच्छ!

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : अंधेरीत पहिल्यांदाच अंधेरी ‘के’ पूर्व विभागात “घाण साफ करणारी मशीन” दाखल झाली आहे. या मशीनमुळे रस्त्याच्या पार्कींगमध्ये व अन्य ठिकाणच्या कानाकोपऱ्यात साचलेला कचरा अवघ्या काही क्षणात साफ होणार आहे. आज महापालिका उपायुक्त रणजित ढाकणे आणि महापालिका सहआयुक्त मनीष वळंजू यांच्या हस्ते उद्घाटन करून मशीनचें लोकार्पण करण्यात आले.

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार “माझी मुंबई स्वच्छ मुंबई” ही संकल्पना गुरुवारी अंधेरीत राबवण्यात आली. त्यानिमित्ताने महापालिकेच्या ‘के’ पूर्व प्रभागात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती अभियान अंधेरीत राबवण्यात आली. या अभियानामध्ये मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता तसेच महानगरपालिका ‘के’ पूर्व विभागाच्या कार्यालय आवारात स्वच्छते बाबत तरुणांनी पथनाट्य सादर केले.

यावेळी तरूणांनी स्वच्छतेबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. या अभियाना अंतर्गत एक विशेष ‘घाण साफ करणारी मशीन’ ही मशीन रस्त्याच्या पार्कींग मधील कचरा व अन्य ठिकाणी कानाकोपऱ्यातील कचरा अगदी काही वेळात स्वच्छ होणार आहे. यामुळे अंधेरीतील रस्त्याच्या पार्कींग मधील व कानाकोपऱ्यातील कचरा साफसफाई होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

 

Back to top button