छगन भुजबळ : ‘ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार’ | पुढारी

छगन भुजबळ : ‘ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार’

पुढारी ऑनलाईन डेस्क : OBC आरक्षण : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणार नाही. असे असूनही ही मर्यादा न ओलांडता ओबीसींना आरक्षण देणार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचीही मंत्री भुजबळ यांनी यावेळी माहिती दिली.

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, आंध्र प्रदेश, तेलंगणा सरकार प्रमाणे अध्यादेश काढला आहे. आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ठेवली आहे. त्या प्रमाणे राज्यात आपण अध्यादेश काढणार आहोत, असं त्यांनी सांगितले.

ओबीसींच्या १० ते १२ टक्के जागा कमी होतील. मात्र ९० टक्के ओबीसींच्या जागा वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावरुन राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ५ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

५ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आज महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी आज माहिती दिली.

 

Back to top button