सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची आज बैठक; न्यायालयीन सुनावणीबाबत चर्चा | पुढारी

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची आज बैठक; न्यायालयीन सुनावणीबाबत चर्चा

बेळगाव / मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न नियुक्त उच्चाधिकार समितीची पहिली बैठक सोमवारी दुपारी 12 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

सीमाप्रश्नी 23 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याआधीची ही बैठक महत्त्वाची असणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केली आहे. त्यामध्ये चौदा जणांचा समावेश आहे. मुंबईतील या बैठकीला समिती सदस्यांसह सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, अ‍ॅड. शिवाजी जाधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Back to top button