बँकांचा आजचा संप लांबणीवर | पुढारी

बँकांचा आजचा संप लांबणीवर

मुंबई : बँक कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत दिल्ली येथील बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने शनिवारी पुकारलेला देशव्यापी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे बँका सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, बँक कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत 19 नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. याविषयी दिल्ली येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Back to top button