किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल | पुढारी

किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विविध पक्षांच्या नेत्यांवर गैरव्यवहारांचे आरोप आणि तक्रारी करून चर्चेत असलेल्या भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात अबु्रनुकसानाचा दावा दाखल करण्यात आला आहे.

गृहनिर्माण विभागाचे अधिकारी प्रवीण कलमे यांनी दाखल केलेल्या या दाव्याची मुंबई शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयाने गंभीर दखल घेत डॉ. किरीट सोमय्या यांच्या विरोधात भारतीय दंड संविधान 500 अंतर्गत दाव्यावर 5 ऑक्टोबरला सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे किरीट सोमय्या यांना खटल्याच्या सुनावणीला हजर रहावे लागणार आहे.

गृहनिर्माण विभाग, एस आर ए, म्हाडा या संस्थांमध्ये काम करणार्‍या बिल्डरांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश विद्यमान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रवीण कलमे यांना दिले आहेत. तसेच प्रवीण कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे असल्याची टिपणी एका पत्रकार परिषदेत केली होती. हे वृत्त त्या नंतर प्रसिद्ध झाले.

सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात प्रवीण कलमे आणि अर्थ या स्वयंसेवी संस्थेने दंडाधिकारी न्यायालयात घाव घेऊन अबु्र नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याची दखल घेत दंडाधिकारी न्यायालयाने 5 ऑक्टोबरला दाव्यावर सुनावणी धेण्याचे निश्चित केले आहे.

Back to top button