संजय राऊत : अटक ते जामीन, पाहा घटनाक्रम  | पुढारी

संजय राऊत : अटक ते जामीन, पाहा घटनाक्रम 

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाने बुधवारी व्यक्तिगत जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांची तब्बल १०३ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली.

27 डिसेंबर 2021 : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’कडून पहिले समन्स.

4 जानेवारी 2022 : वर्षा राऊत यांची ‘ईडी’कडून साडेतीन तास चौकशी.

11 जानेवारी : वर्षा राऊत यांना ‘ईडी’कडून दुसर्‍यांदा समन्स.

2 फेब्रुवारी : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक.

5 एप्रिल : ‘ईडी’कडून संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त.

27 जून : संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ‘ईडी’कडून समन्स.

28 जून : संजय राऊत यांनी वकिलांमार्फत पत्र पाठवत ‘ईडी’कडे चौकशीला हजर राहण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत वेळ मागितली.

1 जुलै : ‘ईडी’च्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या संजय राऊत यांची दहा तास चौकशी.

27 जुलै : संजय राऊत यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स. राऊत चौकशीला गैरहजर.

31 जुलै : सकाळी सात वाजताच ‘ईडी’चे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडुपमधील घरी दाखल. तब्बल नऊ तासांच्या झाडाझडती आणि चौकशीनंतर दुपारी चार वाजता संजय राऊत ‘ईडी’च्या ताब्यात. रात्री उशिरा अटक.

1 ऑगस्ट : संजय राऊत यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी.

4 ऑगस्ट : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’चे समन्स.

6 ऑगस्ट : वर्षा राऊत यांची ‘ईडी’कडून नऊ तास कसून चौकशी.

8 ऑगस्ट : संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. आर्थर रोड कारागृहात रवानगी.

22 ऑगस्ट : 14 दिवसांनी संजय राऊत यांच्या कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ.

5 सप्टेंबर : न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ.

7 सप्टेंबर : जामिनासाठी अर्ज दाखल.

8 सप्टेंबर : जामीन अर्जावरील सुनावणी सुरू.

14 सप्टेंबर : ‘ईडी’कडून संजय राऊत यांच्या जामिनाला जोरदार विरोध; सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर.

19 सप्टेंबर : संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ.

27 सप्टेंबर : सुनावणीवरील कारवाई पूर्ण होऊ न शकल्याने न्यायालयाने सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली.

3 ऑक्टोबर : संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ.

10 ऑक्टोबर : जामीन अर्जावरील सुनावणी 17 ऑक्टोबरपर्यंत पुढे.

21 ऑक्टोबर : ‘ईडी’च्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तिवाद करायचा आहे, असे न्यायालयाला सांगितले. सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत स्थगित.

2 नोव्हेंबर : राऊत यांच्या जामिनासंदर्भात ‘ईडी’ने लेखी उत्तर सादर केले. मात्र, जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला.

9 नोव्हेंबर : संजय राऊत यांना अखेर 102 दिवस कोठडीत काढल्यानंतर जामीन मंजूर.

Back to top button