यांनी घेतला आहे आर्थर रोड जेलचा ‘पाहुणचार’ | पुढारी

यांनी घेतला आहे आर्थर रोड जेलचा ‘पाहुणचार’

मुंबईच्या आर्थर रोड जेलचे बांधकाम ब्रिटिशांच्या काळात म्हणजे 1926 साली झाले. या जेलचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट अभिनेते, राजकारणी आणि मोठमोठे व्यावसायिक तसेच कुख्यात गँगस्टर या जेलमध्ये शिक्षा भोगत होते आणि आहेत किंवा त्यांच्यावर खटले सुरू असल्याने त्यांचा मुक्काम या जेलमध्ये आहे. आर्यन खान, संजय दत्त, सलमान खान, राज कुंद्रा, छगन भुजबळ अशा काही मान्यवरांना या जेलमध्ये राहावे लागले आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब हादेखील याच तुरुंगात होता.

 

अबू सालेम

 अबू सालेम
मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी प्रमुख आरोपी असलेला अबू सालेम या ठिकाणी शिक्षा भोगत होता. नंतर त्याला तळोजा कारागृहात हलवण्यात आले.
———————————————————————————————————————–

छोटा राजन

छोटा राजन
छोटा राजन हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन. त्याला सुरुवातीला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. नतंर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये हलवण्यात आले.
———————————————————————————————————————–

अरूण गवळी

अरुण गवळी
मुंबईतील गँगस्टर अरुण गवळी याला कमलाकर मर्डर केसमध्ये अटक करण्यात आली होती. सुरुवातीला अरुण गवळी याला आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात आले होते. नंतर त्याला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिफ्ट करण्यात आले.


प्रवीण महाजन

प्रवीण महाजन
भाजप नेते प्रमोद महाजन हत्येप्रकरणी अटकेत असलेले त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.


नवाब मलिक

नवाब मलिक
दाऊदची संबंधित व्यक्तीशी व्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.
———————————————————————————————————————–

अनिल देशमुख

अनिल देशमुख
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप तसेच मनी लाँडरिंगप्रकरणी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे त्यांना जेलमध्ये राहावे लागले आहे.

Back to top button