ठाणे : पार्किंमधील सहा वाहनांना आग; तीन वाहने जळून खाक - पुढारी

ठाणे : पार्किंमधील सहा वाहनांना आग; तीन वाहने जळून खाक

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : वसंत विहार येथे सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंमधील सहा वाहनांना आग लागली. या आगीत सहा वाहनांनी पेट घेतला. ही घटना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तीन वाहने जळून खाक झाली. यामध्ये एक चारचाकी वाहनासह दोन दुचाकींचा समावेश आहे. पार्किंगमधील सहा वाहनांना आग लागली हे समजताच नागरिकांत घबराट पसरली आहे.

सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट घेतल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली.

यामध्ये इतर पाच वाहनांनीही पेट घेतला. वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. मात्र आगीवर नियंत्रण मिळवत असताना तीन वाहने पूर्णपणे जळून खाक झाली.

अन्य तीन गाड्यांचे या आगीत नुकसान झाले आहे. ही आग दोन चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांना लागली होती.

ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

हेही वाचलं का ? 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button