मुंबई : वांद्रेत गॅस सबसिडीचे पैसे परत करण्याच्या आमिषाने फसवणूक | पुढारी

मुंबई : वांद्रेत गॅस सबसिडीचे पैसे परत करण्याच्या आमिषाने फसवणूक

मुंबई : भारत गॅस सबसिडीचे सहा हजार रुपये परत करण्याचे आमिष दाखवून ठगाने महिलेची फसवणूक केली. सहा हजारासाठीखात्यातून सव्वालाखांचा अपहार झाला असून वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही महिला वांद्रेत असून ती लायसनिंग सल्लागार म्हणून काम
करते.

काही दिवसांपूर्वी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन भारत गॅस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तिला सबसिडीचे सहा हजार रुपये मिळणार असल्याचे सांगून एक लिंक पाठवली. लिंक ओपन करुन त्यात दहा रुपये ट्रान्स्फर केले. त्यानंतर पाच ऑनलाईन व्यवहार होऊन सव्वालाख रुपये ट्रान्स्फर झाले.

Back to top button