मुंबई : बोरिवलीमध्ये तरुणाची चैन, मोबाईल चोरट्यांनी पळविले | पुढारी

मुंबई : बोरिवलीमध्ये तरुणाची चैन, मोबाईल चोरट्यांनी पळविले

मुंबई : दारु पिण्यासाठी बसलेल्या एका तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईल तीन चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना बोरिवलीत घडली. बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोध सुरु केला आहे.

ही घटना मंगळवारी रात्री दीड वाजता बोरिवलीतील चंदावरकर रोड, गोरागांधी इमारतीसमोरील स्कायवॉकवर घडली. तक्रारदार तरुणाने रात्री मद्यप्राशन केले. त्याच्या शेजारी तीन तरुण मद्यप्राशन करीत होते. दारु पित असताना त्याचा डोळा लागला आणि तो तिथे झोपला होता. हीच संधी साधून या तिघांनी सत्तर हजार रुपयांचीसोनसाखळी, पंधरा हजाराचा मोबाईल घेऊन पलायन केले.

Back to top button