कल्याण ट्रॅप : बेरोजगारांना गंडा घालणारी तब्बल 3 महिन्यांनी जाळ्यात - पुढारी

कल्याण ट्रॅप : बेरोजगारांना गंडा घालणारी तब्बल 3 महिन्यांनी जाळ्यात

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण ट्रॅप : शिपिंग कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याच्या अमिषाने कल्याणच्या तीन बेरोजगार तरुणांना 12 लाख रुपयांचा चुना लावणाऱ्या मानसी खंडेलवाल (41) या तरुणीला 3 महिन्यानंतर गुरुवारी अखेर अटक करण्यात आली.

विशेष म्हणजे या तरुणीला अटक करण्यासाठी गेलेल्या खडकपाडा पोलिसांची तिच्या आईच्या हस्तक्षेपामुळे चांगलीच दमछाक झाली होती. तब्बल दोन तास घराबाहेर ताटकळत थांबलेल्या पोलिसांनी मानसीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कल्याण ट्रॅप

कल्याणच्या आधारवाडी परिसरात ही तरुणीही तिच्या आईसह घरामध्ये बाहेरून टाळा लावून राहत होती. ही तरूणी खडकपाडा पोलिसांना गेल्या तीन महिन्यांपासून गुंगारा देत होती.

अखेर पोलिनसांनी गुप्त बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी धाड टाकून मानसीच्या घराचा दरवाजाला लावलेले कुलूप तोडून तिला बेड्या ठोकल्या.

अटक आरोपी मानसी हिच्यासह तिची आई राघिणी हिच्यावरही मुबंईतील अंधेरी, सहार, खार आणि कल्याणच्या बाजारपेठ व खडकपाडा पोलिस ठाण्यांमध्ये फसवणूकीचे विविध गुन्हे दाखल आहेत.

सद्या आई राघिणी ही जमीनावर आहे. तर मुलगी पोलीसांच्या हाती लागू नये यासाठी राघिणी आई व मुलगी मानसी या दोघीजणी त्यांचा मोबाईल फोन एका रिक्षा चालकाकडे देऊन पोलीसांना गुंगारा देत होत्या.

पोलीस जेव्हा त्यांचा मोबाईल लोकेशन ट्रेस करत होते तेव्हा या दोघी त्यांच्या घरामध्ये आरामात राहत होत्या.

पोलीस आणि त्यांच्यातला हा ससेमिरा तब्बल तीन महिने सुरू होता. अखेर ज्या नागरिकांची फसवणूक झाली होती त्यांनी सुटकेचा निश्व:स सोडला.

पोलीसांच्या खबरीने माहिती दिल्यानंतर गुरुवारी या माय-लेकीच्या लपाछपीचा खेळ उधळून लावून मानसीला अटक केली.

कल्याण न्यायालयाने मानसीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button