MCA Election: एमसीए निवडणुकीसाठी शरद पवार-आशिष शेलार गटाची युती | पुढारी

MCA Election: एमसीए निवडणुकीसाठी शरद पवार-आशिष शेलार गटाची युती

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) निवडणुकीमध्ये सोमवारी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. शरद पवार आणि आशिष शेलार गटाने संयुक्त पॅनेलसह निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले माजी कसोटीपटू संदीप पाटील एकाकी पडले आहेत. पवार गटाने पाठिंबा नाही दिला तरी त्यांनी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
(MCA Election) पवार आणि शेलार गट आमनेसामने असतील, असे चित्र रंगवले गेले. शरद पवार गटाने रविवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये अध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांचे नाव होते. मात्र, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. त्यानंतर दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले. याची अधिकृत घोषणा आज रात्री माटुंगा जिमखाना येथे केली जाण्याची शक्यता आहे. याच ठिकाणी शरद पवार गटाचा दक्षिण आणि मध्य विभागातील सदस्यांचे गेट टुगेदर होणार आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपत आहे. एमसीएची त्रैवार्षिक निवडणूक २० ऑक्टोबरला होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button