Mumbai Andheri East Bypolls | मुंबईतील ‘अंधेरी पूर्व’ची पोटनिवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान

Mumbai Andheri East Bypolls | मुंबईतील ‘अंधेरी पूर्व’ची पोटनिवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान
Published on
Updated on

नवी दिल्ली/मुंबई : सहा राज्यांतील सात जागांवरील विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.३) केली आहे. यासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, महाराष्ट्रातील अंधेरी (पूर्व) (Mumbai Andheri East Bypolls), हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशमधील गोला गोरखनाथ आणि ओडिशामधील धामनगर येथे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल. तर मतदान ३ नोव्हेंबर रोजी आणि मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व जागेवर पोटनिवडणूक

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांना हरवून २०१४ मध्ये रमेश लटके हे  पहिल्यांदा आमदार झाले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांना पराभूत केले होते. हाडाचा शिवसैनिक म्हणून 'मातोश्री'वर त्‍यांची ओळख होती. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.

Mumbai Andheri East Bypolls : पवारांचा ठाकरे गटाला पाठिंबा

मुंबईतील अंधेरी मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news