औरंगाबाद, जालना, बीडला दहशतवादाचे प्रशिक्षण; एटीएसचा दावा | पुढारी

औरंगाबाद, जालना, बीडला दहशतवादाचे प्रशिक्षण; एटीएसचा दावा

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अटकेतील कार्यकर्त्यांनी औरंगाबादेतील पडेगाव, नारेगावसह बीड आणि जालना येथे बंद शेडमध्ये फिजिकल ट्रेनिंगच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. याशिवाय आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा एटीएसने न्यायालयात केला आहे.

या आरोपींकडून मोबाइल, लॅपटॉप व हार्डडिस्क जप्त करण्यात आली आहे. एटीएसच्या या युक्तिवादानंतर दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या पाचही आरोपींची पोलिस कोठडी दोन दिवस वाढविण्यात आली. शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (37, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (28, रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (29, रा. जुना बायजीपुरा), अब्दुल हादी अब्दुल रऊफ (32, रा. रहेमान गंज) आणि शेख नासेर शेख साबेर (37, रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींना रविवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात हजर केले होते.

बाबरी मशीद कही भूल ना जाये हम!

इरफान मिल्ली : पीएफआयच्या राज्य कमिटीचा सदस्य म्हणून काम करतो. त्याच्याकडून 19 इंचाचे तलवारीसारखे शस्त्र जप्त केले आहे. त्याने यापूर्वी अनेक शस्त्र वाटप केल्याचा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. त्याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्याच्याकडेच पीएफआयचे पब्लिकेशन सापडले असून त्यात ‘बाबरी मशीद कही भूल ना जाये हम’ असा उल्लेख सापडला आहे. तो खासगी मदरसा चालवितो. तेथे जिहादी शिक्षण देतो. त्याच्याकडे अनेकांनी शिक्षण घेतले असून त्यांचा शोध एटीएस घेणार आहे.

फैजलचे केरळमध्ये प्रशिक्षण

सय्यद फैजल : 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या ध्येयाने पेटलेल्या फैजलने केरळमधून प्रशिक्षण घेतले आहे. त्यानेच बीड आणि जालना येथे बंद शेडमध्ये तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचा दावा एटीएसने केला आहे. धक्कादायक म्हणजे पीएफआयचा प्रदेशाध्यक्ष शेख नासेर याच्या सांगण्यावरून हे केल्याचे समोर आले आहे. फैजलचे डीसीबी बँकेत खाते होते. सध्या हे खाते बंद असून पूर्वी त्यातून अनेक मोठे व्यवहार झाल्याचा संशय आहे. पूर्वीची माहिती मागविल्याचे एटीएसने कोर्टात सांगितले.

परवेज खान : हा पीएफआयच्या राज्याच्या फिजिकल एज्युकेशन पॅनलवर काम करतो. त्याने औरंगाबादेतील जटवाडा रोड, पडेगाव आणि नारेगाव येथे निर्जनस्थळी बंद शेडमध्ये दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचा दावा एटीएसने केला आहे. शिवाय 15 सप्टेंबरला मडगाव (गोवा) येथे झालेल्या पीएफआयच्या बैठकीत तो हजर होता. तेथेच कारवाईची चाहूल लागल्यामुळे मोबाइलमधील सर्व डाटा डिलिट करण्याचा मेसेज देण्यात आला होता, असा दावा एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात केला. परवेजचे एसबीआय, अ‍ॅक्सिस आणि इंडसइंड बँकेत खाते असून लाखोंमध्ये व्यवहार झाल्याचे उघड झाले. तसेच नाशिकचा आरोपी अब्दुल कय्युमशीही व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

राज्यातील 21 आरोपी एकमेकांच्या संपर्कातशेख नासेर : नासेर हा पीएफआयचा महाराष् ट्र राज्य अध् यक्ष असून त् याच् याच इशार्‍यावर सर्व आरोपी काम करीत असल्याचे समोर आले. एनआयने त् याचे बँक खाते सील केले आहे. खात् यात एक लाख 80 हजार रुपये होते. त् याची चौकशी केली असता महिना सहा हजार मानधन मिळत असल्याचे त्याने कबूल केले. त्याच्या खात्यात एक लाख 80 हजार रुपये सापडले.

Back to top button