मी जनतेमधील माणूस, धमक्यांना मी घाबरत नाही : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

मी जनतेमधील माणूस, धमक्यांना मी घाबरत नाही : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्यावर धमक्यांचा परिणाम होणार नाही. मी जनतेमधील माणूस आहे. मुख्यमंत्री नसतानाही अनेकवेळा या प्रकारच्‍या धमक्या मला आल्या होत्या. त्यामुळे अशा धमक्यांना मी घाबरत नाही. पोलीस, सुरक्षा यंत्रणा काम करत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आज (दि.२) दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे, असे सूत्रांकडून समजते. निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button