RBI Hikes Repo Rate : ईएमआयचा कालावधी वाढणार; रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्याने केली वाढ | पुढारी

RBI Hikes Repo Rate : ईएमआयचा कालावधी वाढणार; रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्याने केली वाढ

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (RBI Hikes Repo Rate) अर्धा टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे आता सामान्यांना मासिक कर्ज हप्ता म्हणजे ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे. रेपो रेट वाढल्यानंतर आता गृह कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय तोच आहे. तथापि, त्याचा कालवधी वाढला आहे. त्यामुळे अशा ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. उदाहरण द्यायचे, तर ज्यांचे गृह कर्ज 15 वर्षे म्हणजे 181 ईएमआय भरून संपणार होते त्यात वाढ होऊन ते आता 18 वर्षे म्हणजे 216 महिने झाले आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर आता संबंधित ग्राहकांना 234 ईएमआय भरावे लागणार आहेत.

अडचणी वाढल्या (RBI Hikes Repo Rate)

गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या लोकांनी घर खरेदी केले आहे, त्यांना आता आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण दोन वर्षांपूर्वी घर घेताना बँकांनी 6.70 टक्क्यांपासून 7.25 टक्के व्याजाने कर्ज दिले होते. आता रेपो दरात वाढ झाल्यामुळे हेच व्याज 8.10 ते 8.65 टक्के झाले आहे.

वाहन कर्जेही महागली (RBI Hikes Repo Rate)

दरम्यान, रेपो दरात वाढ झाल्यामुळे आता सगळ्याच स्वरूपाची कर्जे महागणार आहेत. याचा फटका गृह कर्जाबरोबरच नवी वाहने खरेदी करण्यास उत्सुक असणार्‍यांना बसणार आहे. कारण रेपो रेट वाढवल्यामुळे बँकांकडून कर्जे घेताना त्यावर जास्त मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय वाढणार आहे.

पाचवेळा रेपो दरात वाढ (RBI Hikes Repo Rate)

2022-23 च्या मागील पाच महिन्यांत सलग चारवेळा आरबीआयने रेपो दरात वाढ करून कर्ज महाग केले आहे. वाढती महागाई कमी करण्यासाठी रेपो दरात वाढ केल्याचे कारण रिझर्व्ह बँकेकडून देण्यात येत आहे. याचा परिणाम कर्जदारांवर होत आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर सरकारी कंपन्यांसह फायनान्स कंपन्यादेखील आपल्या व्याज दरात वाढ करतात. त्यामुळेच गृह कर्जात वाढ होत आहे.


अधिक वाचा :

Back to top button