रायगड : न्हावाशेवा बंदरातून १ हजार ७२५ कोटींचे ड्रग्ज जप्त | पुढारी

रायगड : न्हावाशेवा बंदरातून १ हजार ७२५ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रायगडमधील उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरामधून तब्बल १ हजार ७२५ कोटी रुपयांचे २२ टन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशन सेलने ही कारवाई केली. आतापर्यंतच्या अनेक मोठ्या कारवायांपैकी एक मोठी कारवाई मानली जात आहे.

मागच्या दोन- तीन दिवसांपासून उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरात अनेक कारवाया केल्या जात आहेत. त्यातच सीआयओने दोन दिवसांपूर्वी रक्त चंदनाच्या तस्करी संदर्भात कारवाई केली होती. त्यामध्ये जवळजवळ अडीच कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. आता बुधवारी तशीच एक मोठी कारवाई करत, न्हावाशेवा बंदरातून १ हजार ७२५ कोटींचे २२ टन हेराईन जप्त करण्यात आले आहे. परंतु, याबाबत अद्याप अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचलंत का ? 

Back to top button