
पुढारी ऑनलाईन : बृहन्मुंबई महापालिकेने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यंदा ३ लाख, ६६ हजार इतका दंड ठोठावला आहे. गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर मंडळाकडून पाडण्यात आलेल्या खड्ड्यांसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रस्त्यावर १८३ खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मंडळाला आता प्रतिखड्ड्यांसाठी २,००० असा एकूण ३ लाख ६६ हजार दंड भरावा लागणार असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेने म्हटले आहे.