शिवाजी पार्क न मिळाल्यास शिंदे गटाचा मेळावा बीकेसीत | पुढारी

शिवाजी पार्क न मिळाल्यास शिंदे गटाचा मेळावा बीकेसीत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी न मिळाल्यास वांद्रेकुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानाचा पर्याय म्हणून विचार केला जाणार आहे. शिंदे गटाचे प्रतोद आ. भरत गोगावले यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात आयोजित केला जातो. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मूळची शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. याबरोबरच शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आमच्या गटाचाच होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे. महापालिका ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी देणार की शिंदे गटाला हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. दसरा मेळाव्याबाबतच्या या पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी शिंदे गटाच्या सर्व आमदारांची मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली. त्यात महापालिकेने शिवाजी पार्कची परवानगी नाकारल्यास बीकेसीवर मेळावा घेण्याबाबत चर्चा झाली.

 

Back to top button