Rahul Gandhi White T-Shirt : “भारत जोडो यात्रे’मुळे भाजपला धडकी भरली” – नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

Rahul Gandhi White T-Shirt : “भारत जोडो यात्रे’मुळे भाजपला धडकी भरली” –  नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "भाजपचे भय संपत नाही!" असे ट्विट करत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.  भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आजचा चौथा दिवस आहे. या यात्रेला ७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. भाजपने शुक्रवारी (दि.9) पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावर "भारत देखो" म्हणून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो शेअर करत त्या टी शर्टची किंमत आणि ब्रॅंड सांगितला. (Rahul Gandhi White T-Shirt ) या ट्विटला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोलो यांनी याला ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला बुधवारी (दि. ७ सप्टेंबर) कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. दररोज अंदाजे 21 किमी पायी प्रवास केला जाणार आहे, 150 दिवसांत 3 हजार 570 किमी अंतर कापून ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. सोशल मीडियावर या यात्रेची चर्चा सुरु आहे. या यात्रेबद्दल संमिश्र भावना उमटत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावर "भारत देखो" असे ट्विट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी यांनी पांढरा टी शर्ट घातला आहे. तर भाजपने त्याच्या साईडला त्या 'टी' शर्टची किंमत व ब्रॅंड दाखवला आहे. बर्बरी ब्रॅंड असलेल्या या टी शर्टची किंमत दाखवली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi White T-Shirt : भाजपला धडकी

भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या शेअर केलेल्या फोटोसंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,"भाजपचे भय संपत नाही!", राहुल गांधींबद्दल टी शर्टची किंमत वगैरे असे मुद्दे भाजपला काढावे लागत आहे यातूनच सिद्ध होतंय की 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे. राहुल गांधींबद्दल भाजपचे भय संपत नाही.!" नाना पटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये अप्रत्यक्षरित्या पंतप्रधानांच्यावरही टिका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे 10 लाख रुपयांचा सूट परिधान करतात. 

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news