नवी मुंबईत आज २२ हजार ४७६ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार | पुढारी

नवी मुंबईत आज २२ हजार ४७६ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : नवी मुंबई पोलीस आयुक्ततालय अंतर्गत येणाऱ्या 20 पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (शुक्रवार) सार्वजनिक आणि घरगुती अशा एकूण 22 हजार 476 मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी पनवेल महापालिका, उरण नगरपरिषद, नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

आज विसर्जन होईपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही प्रवेश बंदी उद्या शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत असेल. विसर्जन स्थळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती वाहतूक उपायुक्तांनी दिली.

तर स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, होमगार्ड असे एकूण सुमारे 3780 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. तर महापालिका आयुक्तांनी सर्व विसर्जन स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे, लाईफगार्ड, उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी नियुक्त केले आहेत. वाशी, कोपरखैरणे, जुहूगावकडून विसर्जन स्थळी जाणाऱ्या मार्गात बदल केला आहे. वाशी शिवाजी चौकात श्रीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. पोलीस आयुक्त बिपीनकुमार, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह ५ उपायुक्त, 15 एसीपी, 30 पीआय सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button