Kalyan : मुलाने जन्मदात्या आईचा केला खून

Kalyan : मुलाने जन्मदात्या आईचा केला खून
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईचा खून करून तिने आपले 'आयुष्य संपवल्याचा बनाव' रचला. पोलिस तपासात खून असल्याचे उघडकीस आले. मुलाची कसून चौकशी केल्यानंतर दोरीने गळा आवळून आईचा खून केल्याची कबुली मुलाने दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना कल्याण पूर्वेकडे असलेल्या हनुमाननगर भागात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

रवी पुमणी (34, रा. प्रभुकुंज सोसायटी, मनीषा गॅस एजन्सी गोदामाजवळ, हनुमान नगर, कल्याण पूर्व) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर सरोजा पुमणी असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी पुमणी हा बेरोजगार आहे. त्याला नोकरी, व्यवसाय नसल्याने त्याला नशा करण्याचे व्यसन जडले. यासाठी तो आपल्या आईकडून रोज पैशांची मागणी करत असे. सतत पैसे देणे शक्य नसल्याने आई सरोजा त्याला नकार देत होती. याचा राग तो मनात धरून ठेवत असे. मंगळवारी रात्री दीड वाजता आई सरोजा आणि मुलगा रवी घरात होता. नेहमीप्रमाणे त्यांच्यात किरकोळ कारण आणि पैशांच्या विषयावरुन वाद झाला. सरोजाने त्याला पैसे देण्यास नकार दिला.

त्यामुळे संतप्त झालेल्या रवीने आईशी भांडण उकरून काढून तिला बेदम मारहाण केली. रागाच्या भरात त्याने आईला जमिनीवर पाडून नायलॉन दोरीने गळा आवळून तिचे आयुष्य संपवले. आईचा खून केल्यानंतर हे प्रकरण आता आपल्या अंगलट येईल या भीतीने आई सरोजाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा बनाव आरोपी रवीने रचला. त्यासाठी आईचा मृतदेह दोरीच्या साह्याने घरातील सीलिंग फॅनला लटकवला. आपण आपल्या खोलीत झोपलो असताना आपल्या नकळत आईने आयुष्य संपवल्याचे शेजाऱ्यांना सांगण्यास सुरुवात केली.

पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करून सरोजा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. मात्र, हा सारा बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला.या संशयाला उत्तरीय तपासणी अहवालातून पुष्टी मिळाली. महिलेने आपले आयुष्य संपवले नसून हत्या असल्याचे या अहवालात आढळून आले.

त्यानंतर मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक निशा चव्हाण आणि फौजदार दिगंबर पवार यांनी रवीची पार्श्वभूमी तपासली. त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने आईचा नायलाॅनच्या दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी फौजदार दिगंबर पवार यांच्या फिर्यादीवरून रवी पुमणी विरुध्द खून (302) आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न (201) केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news