मुंबई : राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून 'लालबागचा राजा'चे दर्शन | पुढारी

मुंबई : राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून 'लालबागचा राजा'चे दर्शन

मुंबई; पुढारी वृत्‍तसेवा : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (बुधवार) मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध कर, राज्यातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा धावता ठेव, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील देशातील सर्वात प्रगतशील, अव्वल राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक कायम राहू दे, अशी प्रार्थना अजित पवार यांनी गणपती बाप्पांकडे केली.

दरम्‍यान, राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे राज्यपाल कोश्यारी यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा :  

Back to top button