पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईमध्ये एका मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील कामाठीपुरा येथे या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केली. विनोद अरगिले असे त्याचे नाव असून तो मनसेचा उपविभाग प्रमुख असल्याची माहिती मिळत आहे.
कामाठीपुरा येथे मारहाण झालेल्या महिलेचे दुकान आहे. दुकानासमोर संमतीविन बॅनर लावण्यावरून वाद झाला. यातून विनोद याने महिलेला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो महिलेला ढकलताना व मारहाण करताना दिसत आहे. संबंधित पदाधिकाऱ्यावर नागपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे संबंधित पदाधिकाऱ्यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :