पक्ष फोडून विचार चोरता येत नाही; केदार दिघेंचा फडणवीसांना टोला | पुढारी

पक्ष फोडून विचार चोरता येत नाही; केदार दिघेंचा फडणवीसांना टोला

पुढारी डेस्क : “मेहबुबा मुफ्तींबरोबर सत्तेसाठी युती करणारी भाजप शिवसेनेला हिंदुत्व शिकवत आहे. भाजपने आधी स्वतःच्या भूमिका तपासून पहाव्यात. आणि मग इतरांना सल्ले द्यावेत. पक्ष फोडून विचार चोरता येत नाही. महाराष्ट्र आणि तमाम सर्वसामान्य हिंदूंचे हित जपण्यासाठी शिवसेना सक्षम आहे! असे ट्विट करत धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युतर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला नाट्यमयरित्या वळण मिळत गेले. त्यानंतर शिवसेना कुणाची असा वाद सुरु झाला. पक्षचिन्हावरुन वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. आता महाराष्ट्राच्या  राजकारणाला उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेने आणखी एक वळण मिळाले आहे.

विनाशकाले विपरीत बुद्धी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (दि.२६) संभाजी ब्रिगेड सोबत युती करत आहोत असे जाहीर केले आहे. हा एक रणनीतीचा भाग असला तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना पेव सुटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी” म्हणत खिल्ली उडवली होती. या प्रतिक्रियेवर धर्मवीर आनंद दिघे (Kedar Dighe) यांचे पुतणे केदार दिघे यांनी ट्विट करत टोला मारला आहे.

Kedar Dighe : तुम्ही शिवसेनेला सल्ला द्यायची गरज नाही

केदार दिघे यांनी, “मेहबुबा मुफ्तींबरोबर सत्तेसाठी युती करणारी भाजप शिवसेनेला हिंदुत्व शिकवत आहे. भाजपने आधी स्वतःच्या भूमिका तपासून पहाव्यात. आणि मग इतरांना सल्ले द्यावेत. पक्ष फोडून विचार चोरता येत नाही. महाराष्ट्र आणि तमाम सर्वसामान्य हिंदूंचे हित जपण्यासाठी शिवसेना सक्षम आहे!” असे ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर ओळी अशा आहेत की, भाजपने तर मेहबुबा मुफ्तींबरोबर युती केली होती, तुम्ही शिवसेनेला सल्ला द्यायची गरज नाही. तुमचा हिंदुत्वाचा बुरखा तेव्हाच फाडला गेला होता.

हेही वाचलंत का?

 

Back to top button