मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद | पुढारी

मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सव काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने गणेशोत्सवाच्या काळात 74 रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाहतूक शाखेच्या उपायुक्त तथा प्राचार्य प्रज्ञा जेडगे यांनी याबाबतचे आदेशपत्र जारी केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरीक आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी शहरातील विविध ठिकाणी गर्दी करतात. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. विसर्जन मिरवणूकीतही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यासोबतच 54 रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेले आहेत. तर, 57 रस्त्यांवर मालवाहू अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून 114 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई या महत्वाच्या विसर्जन ठिकाणी वाहतुक पोलिसांची विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले
आहेत. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी 10 हजार 644 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसोबतच गृहरक्षक
दल, ट्राफीक वॉर्डन, नागरी संरक्षण दल, एन.एस.एस., आर. एस. पी. तैनात करण्यात आले आहेत. गणेश विसर्जनाच्या दरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी निरिक्षण मनोरे देखील उभे करण्यात येत आहेत.

Back to top button