
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची जळगावमध्ये शिवसंवाद यात्रा होणार आहे. या यात्रेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते व मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. ही शिवसंवाद यात्रा नसून विसंवाद यात्रा असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तुम्ही लोकप्रतिनिधींबाबत जो शब्द वापरता त्याचा विचार करा. तुम्ही लोकप्रतिनिधींचा अनादर करत आहात, असा आरोप केसरकर यांनी ठाकरे यांच्यावर केला.
केसरकर पुढे म्हणाले की, भाजप व शिंदे गटाची युती कायमची झाली आहे, ही युती आता तुटणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत ही युती १५० जागा निवडून आणेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजप नेत्यांना दिलेला शब्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला का ? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचलंत का ?