ठाणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : आज सर्वत्र दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे, या धर्तीवर स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आता सर्व सण जोरात साजरे होणार, गोविंदा जोरात, गणेश उत्सव जोरात, नवरात्र उत्सव जोरात असे बोलत विरोधकांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, 'आता तुम्ही गोविंद नाही तर खेळाडू आहात, राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला स्पर्धेत सहभागी केले असून पुढील वर्षी प्रो गोविंदा ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.. तसेच गोविंदांना दहा लाखांचा विमा कवचही सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. मात्र, सर्व गोविदांनी सावधतेने खेळणे गरजेचे आहे. चांगले थर लावा दहीहंडी उत्साहात साजरी करा, असेही ते म्हणाले. दहीहंडीतला 'मख्खन' हे प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं आहे, असे बोलत महाराष्ट्रातल्या हंडीचा विकास सर्वांपर्यंत पोहोचवणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे वाचलंत का?